Thackeray Family Bhau Beej : ठाकरे कुटुंबाकडून भाऊबीज एकत्र साजरा; खास क्षणांचे फोटो समोर…
Thackeray Family Bhau Beej : उद्धव आणि राज ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब एकत्र

Thackeray Family Bhau Beej : दिवाळीनिमित्त ठाकरे कुटुंबात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. काल बुधवारी भाऊबीजनिमित्त संपूर्ण ठाकरे कुटूंब एकत्र आले होते.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येत भाऊबीज साजरी करताना दिसले. ठाकरे बंधूंनी जयवंती देशपांडे यांच्या घरी उपस्थित राहून भाऊबीजेचा सण पार पाडला.
View this post on Instagram
भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंबातील या खास क्षणांचे कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी हे सुंदर फोटो शेअर करताना ‘भाऊबीज’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
भाऊबीजेच्या या खास प्रसंगी आदित्य ठाकरे आपल्या बहिणीकडून औक्षण करून घेताना आणि तिला भेटवस्तू देताना दिसत आहेत.
तर अमित ठाकरे यांनीही इनस्टाग्रामवर भाऊबीजेच्या दिवशीचे फोटो शेअर केले आहेत.





