Thackeray Brothers : उद्याचा मोर्चा होणार कि नाही? ठाकरे बंधूंची मोठी घोषणा
देशात अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही, कारण देशभरातील युवकांनी एकत्र येत (Thackeray Brothers) या देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढण्याचे अत्यंत ऐतिहासिक काम केले आहे.

Thackeray Brothers : देशात अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही, कारण देशभरातील युवकांनी एकत्र येत (Thackeray Brothers) या देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढण्याचे अत्यंत ऐतिहासिक काम केले आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक तरुणांचे कौतुक केले.
‘मातोश्री’ या निवासस्थानी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आगामी रणनीती आणि आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत भाष्य केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी सरकारने (Thackeray Brothers) हा राजीनामा स्वीकारला आहे की केवळ खातेबदल केला आहे, यावर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता आलेली नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या (CJP) बॅनरखाली आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पाठीशी संपूर्ण देशातील युवक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. या अभूतपूर्व जनरेट्यामुळे हे आंदोलन यशस्वी ठरले असले तरी सीजेपीच्या प्रमुख दोन मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.
त्यामुळे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन असेच सुरू राहील, असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी सांगितले की, देशभरातील युवकांनी दाखवलेल्या या धैर्याचे आणि यशाचे अभिनंदन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार येत्या रविवारी दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून तरुणाईचा भव्य ‘विजय मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे (Thackeray Brothers) आंदोलक अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांचे उद्धव ठाकरे यांनी विशेष अभिनंदन केले. केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका झुरळाने संपूर्ण हुकूमशाहीला जेरीस आणून सोडले आहे.
सीजेपीच्या उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा थांबणार नसून, येत्या काळात अभिजित दिपके यांच्याशी सविस्तर चर्चा करून आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.






