पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाची गुणपत्रके डाऊनलोड करण्यासाठी लिंक खुली करण्यात आली आहे. दि. 20 एप्रिलपर्यंत सर्वांनी गुणपत्रक उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.
शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली टेट परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 24 मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे.
या पात्र उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक डाऊनलोड करण्यासाठी लिंक 20 एप्रिलपर्यंत खुली राहील. त्यावरून गुणपत्रक डाऊनलोड करावी आणि त्याची एक प्रत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.