क्रिकेट विश्वात नव्या फॉरमॅटचा उदय! काय आहे ‘Test Twenty’ फॉरमॅट? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

What is Test Twenty Cricket : क्रिकेटच्या विश्वात एक नवा रोमांचक फॉरमॅट उदयास आला असून त्याचे नाव टेस्ट ट्वेंटी आहे. टी-२०, वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या समृद्ध परंपरेसह आता टेस्ट ट्वेंटी हा नवा फॉरमॅट क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला नवे परिमाण देणार आहे. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हा फॉरमॅट अधिकृतपणे लाँच झाला असून, येत्या जानेवारी २०२६ मध्ये पहिला हंगाम सुरू होणार आहे. हा फॉरमॅट नक्की काय आहे? सविस्तरपण जाणून घेऊया.
टेस्ट ट्वेंटी म्हणजे काय?
टेस्ट ट्वेंटी हा जगातील पहिला ८० षटकांचा फॉरमॅट आहे, जिथे कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे नियम एकत्रित केले गेले आहेत. यात प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करेल, प्रत्येकी २० षटकांचे दोन डाव खेळेल. सामन्यात विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित असे चारही निकाल शक्य आहेत. प्रत्येक संघाला सामन्यात एकदा चार षटकांचा पॉवरप्ले मिळेल. जर एखाद्या संघाने पहिल्या डावात ७५ किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी घेतली, तर फॉलो-ऑन लागू होऊ शकतो. प्रत्येक संघ जास्तीत जास्त पाच गोलंदाज वापरू शकतो, आणि प्रत्येक गोलंदाज कमाल आठ षटके टाकू शकतो.
हंगाम आणि संघ –
पहिल्या हंगामात सहा फ्रँचायझी सहभागी होतील. ज्यामध्ये रतातील तीन आणि दुबई, लंडन, अमेरिकेतील प्रत्येकी एक संघ सामील होणार आहेत. प्रत्येक संघात १६ खेळाडू असतील. या फॉरमॅटची संकल्पना द वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवानी च्या विचारांतून उदयास आली आहे.
सल्लागार मंडळ आणि नेतृत्व –
EXPLAINED: What is Test Twenty? 🤔
Cricket’s newest twist to tradition — where Test meets T20! ⏳⚡📷: ICC #TestTwenty #CricketInnovation #CricketExplained #CricketFans #NewEraOfCricket pic.twitter.com/2UPQDIM82p
— SportsTiger (@The_SportsTiger) October 17, 2025
या फॉरमॅटच्या सल्लागार मंडळात क्रिकेट विश्वातील दिग्गजांचा समावेश आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचे सर क्लाईव्ह लॉयड, दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन आणि भारताचे हरभजन सिंग आहेत. तसेच राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकेल फोर्डहॅम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
दिग्गजांचे काय आहे मत?
एबी डिव्हिलियर्स यांनी सांगितले, “टेस्ट ट्वेंटीमुळे क्रिकेटचा उत्साह वाढेल आणि तरुण खेळाडूंना नव्या संधी मिळतील. सर क्लाईव्ह लॉयड म्हणाले, “हा फॉरमॅट क्रिकेटची कला आणि लय परत आणतो, तरीही आधुनिक ऊर्जेने तो जिवंत ठेवतो.” माजी क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.
हेही वाचा – AUS W vs BAN W : अॅलिसा हीलीचे सलग दुसरे शतक! ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर १० विकेट्सनी दणदणीत विजय
क्रिकेटच्या भविष्याचा नवा अध्याय –
टेस्ट ट्वेंटी हा फॉरमॅट कसोटीच्या रणनीती आणि टी-२०च्या वेगवान रोमांच यांचा अनोखा संगम आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा नवीन अनुभव २०२६ मध्ये मैदानावर उतरणार आहे, ज्याची आतुरता जगभरातील चाहत्यांना लागली आहे.





