राष्ट्राध्यक्षांशी पंगा महागात ! इकडे ट्रम्पनी दिली धमकी तर तिकडे मस्कला १२ अब्ज डॉलर्सचा फटका ; नेमकं काय झालं ?

Tesla Share Falls। अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील मैत्रीची जगभरात चर्चा होत होती. सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना आपले सल्लागारही बनवले. पण काही महिन्यांतच ही मैत्री आता शत्रुत्वात बदलली आहे. ट्रम्प सरकारमध्ये महत्त्वाचे पद भूषवल्यानंतर एलॉन मस्क आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमध्ये सुरू झालेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना काल विचारण्यात आले की ते टेस्ला कंपनीचे मालक मस्क यांना देशाबाहेर काढण्याचा विचार करत आहेत का, तेव्हा ट्रम्प यांनी ,”आपल्याला याचा विचार करावा लागेल.”असेही म्हटले. दरम्यान . त्यांच्या याच वाक्याचा परिणाम एलॉन मस्क यांच्यावर पडला असल्याचे दिसत आहे.
मस्कचे मोठे नुकसान Tesla Share Falls।
इतकेच नाही तर ट्रम्प यांनी एलॉन मस्कच्या कंपन्यांना मिळणारे अनुदान कमी करण्याची धमकीही दिली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी असेही म्हटले आहे की, जर असे झाले तर मस्कना त्यांचे दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल. याठिकाणी मस्क यांनी असेही म्हटले आहे की ते यासाठी तयार आहेत. त्यांनी सांगितले की सर्वकाही बंद करा.
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील या वादामुळे टेस्लाचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घसरले आणि त्यामुळे मंगळवारी त्यांना १२.१ अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार,”एका दिवसात इतक्या मोठ्या धक्क्यानंतर, मस्कची एकूण संपत्ती आता ३५१ अब्ज डॉलर्सवर आली आहे.”
आता कोणते पर्याय आहेत? Tesla Share Falls।
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान एलॉन मस्कने ट्रम्पच्या बाजूने सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स खर्च केले. प्रश्न असा निर्माण होत आहे की अशा परिस्थितीत, ज्या प्रकारे ट्रम्पकडून एलॉन मस्कला धमकावले जात आहे, मग त्यांच्याकडे कोणते पर्याय उरले आहेत? ज्यासाठी एलॉन मस्क अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ला करत होते, ते बिग ब्युटीफुल बिल अमेरिकन सिनेटने मंजूर केले आहे. अशा परिस्थितीत, एक प्रश्न असा आहे की त्यांना हद्दपार करता येईल का?





