श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरस्थित श्रीनगरतील परिम पोरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.
परिम पोरामध्ये एक चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर एका जखमी दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
#UPDATE J&K: One injured terrorist has been apprehended by security forces, in Parim Pora, Srinagar. Arms & ammunition recovered. https://t.co/K2RSQSxGlE
— ANI (@ANI) February 5, 2020
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी जम्मू-श्रीनगर महामार्गावरील नगररोटा टोल प्लाझावर एका ट्रकमध्ये दहशतवादी लपून प्रवास करत होते. या ट्रकला तपासणीसाठी थांबविण्यात आले असता लपलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला होता. यामध्ये दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते.





