Operation Sindoor : दहशतवादाला थारा नाही! सचिन तेंडूलकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला “भारताची खरी ढाल…”

Sachin Tendulkar : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले होते. या भ्याड हल्ल्याचे भारतवासीयांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला होता. या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे.
आज मध्यरात्री भारतीय सैन्याने पीओकमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईट केला आहे. या हवाई हल्ल्याला अॅापरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सेलिब्रेटींपासून अनेकांनी कौतुक केले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने देखील भारताने हवाई हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानाला प्रत्युत्तर दिल्याचे कौतुक केले आहे. याविषयी सचिने त्याच्या इन्स्टावर पोस्ट लिहिली आहे.
“Fearless in unity. Boundless in strength. India’s shield is her people. There’s no room for terrorism in this world. We’re ONE TEAM!” म्हणजेच, “एकता निर्भय आहे. त्याची शक्ती असीम आहे. भारताची खरी ढाल म्हणजे तिची जनता! दहशतवादाला जगात कुठेच थारा नाही. आम्ही सर्व एकाच टीममध्ये आहोत.” असे पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे. सचिनसह वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, प्रग्यान ओझा आदी खेळाडून देखईल भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.





