Raigad Accident : रायगडमध्ये भीषण अपघात; भरधाव डंपरची एसटी बसला धडक, ४ प्रवाशांचा मृत्यू; २० गंभीर जखमी
Updated On:

रायगड : रायगडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.. भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ही घटना तळा-मांदाड रस्त्यावर घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.




