मलठणमध्ये भीषण अपघात! १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, टेम्पोचालक फरार
Updated On:

शिरूर- शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी परिसरात २२ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय गणेश शितकल (रा. कवठे येमाई) याचा मृत्यू झाला. गणेश आपल्या बजाज पल्सर (MH 12-LZ-6806) वरून जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो टेंपो (MH 16-CD-6852) ने चुकीच्या बाजूने येत जोरदार धडक दिली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालक वाहन सोडून फरार झाला. गणेशचे काका कैलास कुलके यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शिवाजी बनकर तपास करीत आहेत.





