Malthan : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद निवडणुकीत खडकी देऊळगावराजे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण जागेचे आरक्षण असल्याने अनेक दिग्गज पक्षाचे नेते निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ही लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. राष्ट्रवादीपुढे भाजपने कडवे आव्हान उभे केल्याने राष्ट्रवादी आणि भाजपसाठी हा सामना अटीतटीचा झाला आहे. खडकी गटात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये मुख्य लढत होत आहे. त्यामुळे खडकी देऊळगाव राजे गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. भाजपची उमेदवारी आप्पासाहेब पवार यांना मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी वीरधवल जगदाळे यांना मिळाली आहे. हे दोन्ही दिग्गज उमेदवार आपले स्वतःचे गाव व गट यामध्ये आरक्षण राखीव असल्याने शेजारील खडकी देऊळगाव राजे गटात निवडणूक लढविण्यासाठी उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आप्पासाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दौंड तालुका अध्यक्षपदाची धुरा गेली अनेक वर्ष सांभाळत होते. हेही वाचा : Pimpri : महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी विशेष सभा परंतु मागील विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने त्यांची विधानसभा लढवण्याची संधी हुकली होती. त्यानंतर नगर परिषद व महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्याने शरद पवार गटातील पदाधिकारी डावलले गेले. यात अनेक नेत्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गट एकत्रितपणे निवडणूक असल्याने पुन्हा आप्पासाहेब पवार यांची अडचण झाली. आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम केले असेल तरी प्रत्येक वेळेस ऐन निवडणुकीच्या तोंडावर आप्पासाहेब पवार यांना डावलण्यात येत असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यात नाराजीचा सूर उमटत होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला. ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. पवार यांना खडकी गटातून भाजपने उमेदवारी देवून लढत चुरशीची केली आहे. राष्ट्रवादीतील एक गठ्ठा मतदानात आता विभाजन होणार असल्याने याचा नेमका लाभ कोणाला होणार आहे याची चर्चा सुरू आहे. आप्पासाहेब पवार यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. तसेच पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्यपदी काम केले आहे. त्यांची कारकीर्द विकासात्मक राहिली आहे. त्यांच्या पत्नी रोहिणी पवार यादेखील पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा कायमच दबदबा कायम आहे. पूर्व भागात त्यांचा पहिल्यापासून दांडगा जनसंपर्क आहे. अप्पासाहेब पवार यांना मानणारा मोठा घटक हा त्यांच्या बाजूने उभा आहे. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. या सर्व बाबींचा विचार करून भारतीय जनता पार्टीकडून आमदार राहुल कुल यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. चुरशीचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडकी देऊळगावराजे जिल्हा परिषद गटामध्ये वीरधवल जगदाळे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. वीरधवल जगदाळे हे मागील दोन पंचवार्षिकमध्ये या भागाचे पुणे जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केले आहे. दौंड शुगर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा सतत संपर्क होत असतो.त्यांना आई-वडिलांकडून राजकारणाचा वारसा लाभला असला तरी या परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मागील काही दिवसांमध्ये दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पुतणी कु. दुर्गादेवी जगदाळे यांचा नगराध्यक्षपदी मोठ्या फरकाने विजय झाला आहे. या वातावरणाचा त्यांना पूर्व भागातील जिल्हा परिषद निवडणुकीत किती फायदा होतो याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच चित्र स्पष्ट… याव्यतिरिक्त खडकी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, वासुदेव काळे यांची मुलगी डॉ. हर्षदा काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बापूसाहेब सकुंडे, मलठण गावचे अमर परदेशी आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी, उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. हेही वाचा : Pune ZP Election 2026 : प्रस्थापितांची झोप उडाली! पाबळ गटात ‘या’ दोन मित्रांची जोडी पडणार भारी? पाहा