Accident News : कात्रज चौकात भीषण अपघात; टेम्पोच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू
Updated On:

पुणे : कात्रज चौकात आज (१५ ऑगस्ट) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण रस्त्याने दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या टेम्पोने त्याला धडक दिली. धडकेनंतर संतुलन सुटल्याने तो रस्त्यावर कोसळला आणि टेम्पोचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि अपघातग्रस्त वाहन जप्त केले. टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे कात्रज चौक परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहतूक नियंत्रण व रस्ता सुधारणा करण्याची मागणी केली आहे.





