फिनआयक्यू करंडक टेनिस स्पर्धेत 100 खेळाडू सहभागी होणार
Updated On:
पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत राज्यभरातून 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
हि स्पर्धा मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे दि.6 ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत रंगणार आहे. तसेच, या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक या ठिकाणाहून 100 हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा 10 वर्षाखालील मुले व मुली एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.





