सचिन बनला हजारो जीवांचा पोशिंदा

मुंबई – सामाजिक कार्यात मदतीसाठी लवकर पुढे येत नाही अशी टीका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नेहमीच केली जाते. यावेळी मात्र सचिनने या सर्व टीकांना चोख उत्तर देत करोनाचा फटका बसलेल्या जवळपास 4 हजार मुलांची जबाबदारी सचिनने घेतली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या शाळांतील या हजारो मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी सचिनने हाय फाय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घेतली आहे. या मुलांच्या मदतीसाठी सचिनने जरी पुढाकार घेतला असला तरी त्याने आपले नाव प्रसिद्ध करु नका अशी विनंती या संस्थेला केली होती. मात्र, तरीही त्यानेच ही मदत केल्याचे या संस्थेने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे जाहीर केले आहे.
Thanks @sachin_rt for proving once again that #sports encourages compassion! Your generous donation towards our #COVID19 fund enables us to financially aid 4000 underprivileged people, including children from @mybmc schools. Our budding sportspersons thank you, Little Master!😊
— Hi5 Youth Foundation (@hi5youth) May 7, 2020
देशात लॉकडाऊन आहे, तसेच अद्याप करोनाचा धोकाही संपलेला नाही त्यामुळे या मुलांची खूपच परवड होत होती. याची माहिती या संस्थेने सचिनला सांगितली व त्याने क्षणाचाही विलंब न करता मदत केली. करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देखील सचिनने केंद्र व राज्य सरकारला सढळ हस्ते मदत केली होती.





