बुलढाणा जिल्ह्यात धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक; 10 जखमी
Updated On:

बुलढाणा – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मोहरमच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत सुमारे १० जण जखमी झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. गुजरी चौकातून सुरू झालेली मिरवणूक गरीब शाह बाबा दर्ग्याकडे जात असताना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
साखरखेर्डा गावातील मालीपुर्या परिसरात दगडफेकीची ही घटना घडली. त्यात १० जण किरकोळ जखमी झाले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर जमाव पांगला. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तणावग्रस्त भागात आता शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.





