सातारा – म्हसवड, दहिवडीसाठी दहा कोटींचा निधी

सातारा – नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत दहिवडी नगरपंचायतीसाठी चार कोटी 70 लाख आणि म्हसवड नगरपरिषदेसाठी पाच कोटी 30 लाख असा एकूण दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन्ही शहरात विविध विकासकामे मार्गी लागली असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
नगरविकास विभागाकडून मिळालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना आ. गोरे म्हणाले, प्रकल्प खर्चाचा 100 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असणाऱ्या योजनेतून म्हसवडमध्ये पाच कोटी 30 लाखांच्या निधीतून म्हसवड- पुळकोटी रस्ता ते मेगासिटी विरकरवाडी ऍप्रोच रस्त्याच्या कामासाठी 50 लाख, म्हसवड- हिंगणी ऍप्रोच कलेढोणे वस्ती रस्ता 25 लाख, म्हसवड- शिंगणापूर रस्ता ते शिंदे तावसे वस्ती रस्ता 50 लाख, म्हसोबा मंदीर ते सुभानवस्ती शाळा ऍप्रोच पाण्याची टाकी तावसे वस्ती रस्ता 20 लाख, म्हसवड- माळशिरस रस्ता ऍप्रोच ते कोडलकर वस्ती रस्ता 40 लाख, तावसे खांडेकर वस्ती रोड ते सुभाष तावसे घरापर्यंत रस्ता 15 लाख, नाभिक गल्ली येथे समाज मंदिर 25 लाख, मुस्लिम समाज मंदिर 25 लाख,
भगवान गल्ली व्यायम शाळा 20 लाख, मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षक भिंत 35 लाख, मासाळवाडी रस्ता 50 लाख, म्हसवड गंगोती रोड ते रेस्ट हाऊस बंधारा रस्ता 30 लाख, नागोबा रोड ते मसाईवाडी रस्ता 35 लाख, पवारवस्ती रस्ता 30 लाख, मासाळवाडी ये शेंडगेवाडी रस्ता 30 लाख, नगरपरिषद हद्दीतील चौक सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
दहिवडी नगरपंचायतीसाठी मंजूर निधीतून प्रभाग 9 मधील अंतर्गत रस्ते, गटार आणि सुशोभिकरणासाठी 50 लाख, प्रभाग 15 मधील विकासनगर, समर्थनगरसाठी 50 लाख, प्रभाग सहासाठी 50 लाख, प्रभाग 13 मधील शिंदे नगर येथे महालक्ष्मी सभामंडप व सुशोभिकरणासाठी 15 लाख, प्रभाग सात मधील गांधीनगर येथील अंतर्गत रस्ते, गटर आणि सुशोभिकरणासाठी 50 लाख, प्रभाग 11 मधील बिदाल रोड कॅनॉल शेजारुन आदर्श शाळेपर्यंत कॉंक्रिट रस्ता 15 लाख,
कॅनॉल साकव 15 लाख, जगताप ते देवकर घर डांबरीकरण 15 लाख, बंदीस्त गटर 10 लाख, प्रभाग पाचमधील सिद्धनाथ व्यायाम शाळा 50 लाख, प्रभाग 13 मधील प्रियदर्शनी डेअरी रस्ता 10 लाख, प्रभाग तीनमधील महालक्ष्मी मंदिरानजीक सभागृह 10 लाख, प्रभाग दोन मधील सेवालाल नगर सामाजिक सभागृह 10 लाख, प्रभाग 17 मधील मोरेमळा ते साळुंखे वस्ती रस्ता एक कोटी, कॅनॉल साकवसाठी 20 लाख असा एकूण 4 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.





