Tempest Advertising: भारतातील आघाडीची क्रिएटिव्ह जाहिरात एजन्सी असलेल्या ‘टेम्पेस्ट ॲडव्हर्टायझिंग’ने आपल्या सर्जनशीलतेची मोहोर पुन्हा एकदा उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘बिग बँग अवॉर्ड्स २०२५’ मध्ये टेम्पेस्टने तीन महत्त्वाचे पुरस्कार जिंकून आपली यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. शेतीपासून ते मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील ब्रँड्ससाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद साधण्यात टेम्पेस्टने मिळवलेले हे यश जाहिरात क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. एक ब्रॉन्झ आणि दोन सिल्व्हर पुरस्कार – या सोहळ्यात टेम्पेस्टने एक ब्रॉन्झ आणि दोन सिल्व्हर पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सिंजेंटा इंडियाच्या “हर किसान का समाधान” या ब्रँड फिल्मसाठी एजन्सीला ब्रॉन्झ पुरस्कार मिळाला असून, यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना शास्त्रशुद्ध पर्याय देणारा विश्वासू भागीदार म्हणून सिंजेंटाची प्रतिमा मांडण्यात आली होती. सिंजेंटा एनकेच्या भारतीय कृषी क्षेत्रातील २५ वर्षांच्या वारशाचा गौरव करणाऱ्या “२५ साल से सफल, एनके फसल” या मोहिमेला सिल्व्हर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अमेरिकन ब्रँड ‘डेव्ह अँड बस्टर्स’च्या मुंबईतील दिमाखदार पदार्पणासाठी राबवलेल्या “ईट. ड्रिंक. प्ले. वॉच.” या मोहिमेलाही सिल्व्हर पुरस्कार मिळाला आहे. तुराब लकडावाला यांच्या सक्षम नेतृत्वाखाली टेम्पेस्ट ॲडव्हर्टायझिंग गेली २७ वर्षे जाहिरात क्षेत्रात कल्पक निर्मिती करत आहे. “आमच्या अनुभवातून तुमची प्रगती” या तत्त्वाने काम करणारी ही एजन्सी पुणे, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपले कामकाज पाहते. शेतीपासून ते लाइफस्टाईलपर्यंत विविध क्षेत्रात सादर केलेल्या आधुनिक आणि मूल्यवृद्धी करणाऱ्या संकल्पनांमुळेच टेम्पेस्टने हे यश संपादन केले आहे.