Gaurav Khanna And Akanksha Chamola: विभक्त होण्याच्या चर्चांदरम्यान ‘लॉकअप 2’मध्ये गौरव खन्नाची एंट्री; आकांक्षा चमोला झाली भावूक
Gaurav Khanna And Akanksha Chamola गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे एकेकाळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न केले. सोशल मीडियावर दोघेही अनेकदा एकत्र दिसायचे.

Gaurav Khanna And Akanksha Chamola: ‘लॉकअप 2’ या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये सध्या अनेक धक्कादायक खुलासे आणि भावनिक क्षण पाहायला मिळत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अभिनेता गौरव खन्नाने शोमध्ये सरप्राइज एंट्री करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यासमोर ते अचानक आल्याने त्या भावूक झाल्या. दोघेही गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याची माहिती आकांक्षाने यापूर्वी शोमध्ये दिली होती. त्यामुळे या भेटीकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले होते.
‘लॉकअप 2’मधील ‘व्हिजिटिंग अवर्स’दरम्यान होस्ट फराह खान यांनी स्पर्धकांना एक खास पाहुणा भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गौरव खन्ना यांची एंट्री झाली. घरात प्रवेश करताच त्यांनी एक भावूक शायरी सादर केली. त्यांच्या या अनपेक्षित आगमनामुळे घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले, तर आकांक्षा चमोला यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. गौरव यांना समोर पाहताच त्या भावूक झाल्या. त्यावेळी वातावरण हलकं करत गौरव हसत म्हणाले, “बँड वाजवलीस तू.”
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे एकेकाळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न केले. सोशल मीडियावर दोघेही अनेकदा एकत्र दिसायचे. त्यांची केमिस्ट्री आणि एकमेकांवरील प्रेम चाहत्यांना खूप आवडायचे. विविध कार्यक्रमांमध्येही ते एकत्र सहभागी होत असत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली.

Akansha Chamola and Gaurav Khanna
काही दिवसांपूर्वी ‘लॉकअप 2’मध्ये आकांक्षा चमोला यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, त्या आणि गौरव खन्ना गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून लवकरच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या विधानानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली.
याच शोमध्ये आकांक्षाने आणखी एक वैयक्तिक खुलासा केला. लग्नापूर्वी त्या स्वतःला बायसेक्शुअल म्हणून ओळखत होत्या आणि महिलांसोबतही त्यांचे संबंध होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी या विषयावर वेगवेगळ्या मतांची मांडणी केली.
दरम्यान, गौरव खन्ना यांच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळे ‘लॉकअप 2’ला नवे वळण मिळाले आहे. दोघांमधील संवाद, त्यांची भावनिक प्रतिक्रिया आणि एकमेकांबद्दलचा आदर यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरला. जरी दोघांचे वैवाहिक नाते संपण्याच्या मार्गावर असले, तरी या भेटीत कटुतेपेक्षा भावनिक जिव्हाळा अधिक जाणवत होता.
आता या भेटीनंतर शोमध्ये पुढे काय घडणार, गौरव आणि आकांक्षा पुन्हा एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी या भावनिक भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून ‘लॉकअप 2’मधील हा भाग चर्चेचा विषय ठरला आहे.





