Naxalite: एक कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी महिलेला अटक

जगदलपूर – तेलंगणा राज्यातील महबूबनगर येथील एसआयबीच्या पथकाने बस्तरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सुजाता या महिला नक्षलवादीला अटक केली आहे. पकडलेली महिला नक्षलवादी सुजाता हिच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता ही दहशतवादी नक्षलवादी किशनची पत्नी आहे, जी गेल्या 3 दशकांपासून तेलंगणा, बंगाल आणि बस्तरमध्ये सक्रिय होती. डीकेएसझेडसीचे सचिव रामण्णा यांच्या मृत्यूनंतर नक्षलवादी नेत्यांनी सुजाताला बस्तरचे प्रभारी बनवले. केंद्रीय समिती सदस्य आणि दक्षिण सब झोनल ब्युरोच्या प्रभारी म्हणून, सुजाता उर्फ मैनी बाई उर्फ जानकीने आपला बहुतेक वेळ बस्तरच्या जंगलात घालवला आहे.
सुजाताला बस्तरच्या अंतर्गत भागांबद्दल बरीच माहिती होती. सुजाता अनेकदा विजापूरच्या तररेम पोलीस स्टेशनच्या भाटीगुडा, तुमालपाट आणि मीनागुट्टाच्या जंगलात दिसायची. तेलंगणा पोलिसांनी सुजाताला मेहबूबनगर येथून अटक केली.





