काॅंग्रेसने निडणुकीत दिलेले आश्वासन केले पूर्ण; ‘या’ राज्यातील लाखों शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ

crop loan – तेलंगणा सरकारने गुरुवारी 5,644.24 कोटी रुपयांच्या पीक कर्जमाफीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू केला. 4.46 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आपल्या निवडणूक आश्वासनानुसार, काँग्रेस सरकारने 8 जुलैपासून तीन टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू केली.
पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात आले. एका सरकारी प्रकाशनात म्हटले आहे की पहिल्या टप्प्यात 6,098.93 कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्याचा 11,50,193 शेतकऱ्यांना फायदा झाला.
दुसऱ्या टप्प्यात 6,190.01 कोटी रुपये खर्च –
दुसऱ्या टप्प्यात 6,190.01 कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्यामुळे 6,40,823 शेतकऱ्यांना मदत झाली. खम्मम जिल्ह्यातील व्यारा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी म्हणाले की 2022 मध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पीक कर्जमाफीची अंमलबजावणी केली जात आहे.
निवडणुकीत दिले होते आश्वासन –
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता ती हे वचन पूर्ण करत आहे.





