तेजस्विनी पंडितचे निर्माती क्षेत्रात पदार्पण; नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Tejaswini Pandit Movie | अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘येक नंबर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: तेजस्वीनी पंडितने केली आहे. तर याचं दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. तेजस्वीनीने या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीनीच्या या नव्या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यानंतर आता ‘येक नंबर’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.
या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत आहे. त्याच्या जॅकेटवर ‘मी महाराष्ट्राचा…महाराष्ट्र माझा’ असं लिहिले आहे. त्याच्या खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटलीही आहे. प्रेमात वेडा आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा हा तरुण नेमका कोण आहे? याची कथा नेमकी काय असणार? हा प्रश्न अनेकांकडून केला जात आहे.
View this post on Instagram
झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. Tejaswini Pandit Movie |
तेजस्वीनी पंडितनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये “मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा…!” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या संगीत आणि गाण्याची जबाबदारी अजय – अतुल या जोडीवर आहे. मात्र अद्याप या चित्रपटात नेमकी कोणते कलाकार असणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. Tejaswini Pandit Movie |
हेही वाचा:
ठाकूर बांके बिहारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; गुदमरून वृद्ध भाविकाचा ‘मृत्यू’





