“नागराज मंजुळे आकाशला…” मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबाबत तेजस्विनी पंडितने केला खुलासा

मुंबई – मालिका,वेबसिरीज सिनेमा अशा विविध कलाकृतींद्वारे आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अथांग’ या सिरीजच्या निमित्ताने तेजस्विनी एका नव्या भूमिकेत दिसून आली. आगळावेगळा विषय असलेल्या या सिरींजची निर्मिती तेजस्विनीने केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तेजस्विनीने मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबाबत भाष्य केले.
बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात चालणारी गटबाजी किंवा ग्रुपिझम आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु मराठीमध्ये असं काही आहे का असा सवाल तेजस्विनीला विचारण्यात आला होता.गेल्या काही दिवसांमध्ये मी ठराविक लोकांसोबतच काम करत आहे अशी टीका माझ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी मी फक्त संजय जाधव यांच्यासोबत काम करते अशाही चर्चा होत्या. परंतु दिग्दर्शकालाही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करण सोपं जात असलयाचं तेजस्विनी सांगते.
मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबाबत बोलताना तेजस्विनी म्हणाली,नागराज मंजुळे देखील आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटामध्ये घेतोच की त्यामुळे असं काही नाही की फक्त संजय जाधवचं कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे. असं स्पष्ट मत तेजस्विनीने यावेळी मांडले.





