Tejaswini Pandit : राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर..अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिलं रोखठोक उत्तर

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या आगामी ‘ये रे ये पैसा ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती मुलाखती देत आहे. खरंतर तेजस्विनी पंडित हे मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची कलाकार म्हणून ओळखली जाते.
राज ठाकरे यांचे समर्थनही विविध प्रश्नांच्या अनुषंगाने करत असते. अनेकदा ती राज्यातील राजकारणाविषयी आपले मतही मांडत असते. तिला एका मुलाखती दरम्यान राज ठाकरेंबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला तेजस्विनी हिने रोखठोक उत्तर दिले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नुकतीच अजब गजब या पॅाडकास्टला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिला राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काय होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. असं झालं तर खूप भारी असेल. कारण त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलले आहे, तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की तो माणूस महाराष्ट्राला सर्वात वरती ठेवतो. कुटुंबापेक्षाही वर ठेवतो. माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे. असे आपल्याकडे खूप कमी राजकारणी आहेत, असे उत्तर तिने दिले आहे.
….पण आत्ताच्या राजकारणात
याशिवाय तिने पूर्वीचे राजकारण आणि सध्याचे राजकारण याविषयी आपले प्ररखड मत व्यक्त केले. पूर्वीचे राजकारणी माणसं खूप वेगळी होती. तेव्हाचे राजकारणही खूप वेगळं होतं. त्यात एक प्रकारची नैतिकता होती, ग्रेस होती, पावर होती, पण आत्ताच्या राजकारणात सगळं बिघडल्यासारखं वाटतं, असल्याची खंत तिने बोलून दाखवली.
सध्या तरी तसा विचार नाही
राजकारणात येणार का या प्रश्नावर बोलताना तेजस्विनी म्हणाली मी त्याच्यावर बोलू शकते. मला त्यातल फरक कळतो म्हणून मी बोलते. ज्या गोष्टी मला पटतात त्या बाजूने मी उभी राहते, असे मत तिने व्यक्त केले. समाजकारण करण्यासाठी राजकारणात यावच लागतं असं नाही पण लोकांनी याकडे एक संधी म्हणून ही बघितलं पाहिजे. सध्या तरी तिने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा : ‘सत्तेत आल्यानंतर लोक अहंकारी होतात’ ; नाव न घेता नितीन गडकरींनी आता कोणावर साधला निशाणा ?





