Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचा बिझनेस सेन्स जबरदस्त! घरबसल्या करतेय तगडी कमाई; स्मार्ट इन्वेस्टमेंटवर दिली मोठी माहिती

Tejasswi Prakash: टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व हायेस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक तेजस्वी प्रकाश फक्त अभिनयातूनच नाही, तर घरबसल्या देखील मोठी कमाई करतेय. अलीकडेच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये तीने आपल्या इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि बिझनेसविषयी खुलासा केला.
कामाची आवड आणि लवकर इन्वेस्टमेंट करण्याची सुरुवात
तेजस्वीने सांगितलं की तिने खूप आधीपासूनच इन्वेस्टमेंट सुरू केली होती. तिला सतत काम करत राहणं आवडतं. कोविडच्या काळात काम थांबू नये म्हणूनच तीने ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला होता. अभिनयासोबतच सध्या ती रिअल इस्टेट बिझनेसही सांभाळतेय.
रिअल इस्टेट आणि सलून… घरबसल्या होतेय मोठी कमाई
तेजस्वी प्रकाशने सांगितलं की तिच्या नावावर अनेक प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजमधून तिला घरबसल्या भाडं मिळतं, त्यामुळे ती जागा न वापरताही पैसा कमावते.
ती म्हणाली,
“कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट केलं तर घरबसल्या कमाई होते. हे खर्च नाही, तर कमाई करून देणारं इन्वेस्टमेंट आहे.”
तेजस्वीचा सलूनचा व्यवसायही आहे, ज्यातून देखील ती सातत्याने उत्पन्न कमावतेय.
“महागड्या गोष्टींपेक्षा पैसे कमवणाऱ्या गोष्टींत खर्च करा”
तेजस्वी तरुण मुलींना सल्ला देत म्हणते,
“महागड्या घड्या, हाय हील्स घेतल्या की स्टेटस दिसतं असं वाटतं, पण त्यापेक्षा पैसे कमवून देणाऱ्या गोष्टींमध्ये इन्वेस्ट करायला शिका.”
रोलेक्स घड्याळ खरेदी; पण आधी सुरक्षित इन्वेस्टमेंट
अभिनेत्रीने सांगितलं की तिने नुकतंच रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं, पण तेही पूर्णपणे विचार करून घेतलेला निर्णय होता.
ती म्हणाली,
“मी आज बिझनेसमध्ये इन्वेस्ट करू शकते, म्हणजे महागड्या गोष्टी सहज खरेदी करू शकते. पण माझा निर्णय आहे की आधी प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे घालावे आणि नंतर लक्झरी गोष्टींवर खर्च करावा.”





