Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना नेमकं काय झालं? ; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी व्हीलचेअरवरून विधानसभेत दाखल
Tejashwi Yadav: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरवरून विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेण्यात आले.
Updated On:

Tejashwi Yadav: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरवरून विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेण्यात आले. त्यांना असे पाहून सर्वानाच धक्का बसला.
दरम्यान , राष्ट्रीय जनता दलने त्यांच्या प्रकृतीबद्दल स्पष्टीकरण देताना, “त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे आणि ते सध्या बरे होत आहेत.” असे म्हटले आहे.
तेजस्वी यांच्या पायाचे नख निखळले (Tejashwi Yadav )
राष्ट्रीय जनता दलाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. पक्षाने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२५ जानेवारी रोजी पडल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या पायाचे नख निखळले आहे.” राजदने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे की ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत आणि हळूहळू बरे होत आहेत.
बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू Tejashwi Yadav:
दरम्यान, बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, २ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान विधानसभेच्या विस्तारित इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संयुक्तपणे संबोधित करतील.

Tejashwi Yadav
उद्या, ३ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री बिजेंद्र प्रसाद यादव २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभेचे हे अधिवेशन २७ फेब्रुवारीपर्यंत चालेल.




