Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांकडून सिस्टीमचे अपराधीकरण; संजय राऊतांची टीका
ठाकरेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना माफिया असे म्हटले. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut : देशात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीची आज बैठक झाली. या बैठकीत इंडिया आघाडी प्रमुख नेते उपस्थित होते. तर, महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व खासदारही हजर होते.
या बैठकीनंतर बोलताना ठाकरेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना माफिया असे म्हटले. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करताना म्हटले की, ज्ञानेश कुमार माफिया आहेत. त्यांनी सिस्टीमचे अपराधीकरण केले. यांच्याशी कसे निपटायचे हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरूद्धची लढाई, हा संघर्ष राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच, मोदी- शाह घाबरून आतमध्ये बसले आहेत. दिल्लीच्या रस्त्यावर त्यांनी आर्म फोर्स लावली आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरु राहील, प्रत्येक राज्यात सुरु राहील, असेही राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.
सरकार आता जंतर मंतरवर आंदोलन करू देणार नाही, मैदानाबाहेर आंदोलन करा म्हणत आहात म्हणजे, तुम्ही घाबरताय, तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. आमचे आंदोलन सुरु राहणार, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले.
तसेच, इंडिया आघाडीसोबत आम्ही आहोत, आम्ही आंदोलन करत राहणार, देशातील संविधान धोक्यात आहे. दिल्ली ते गल्ली हे आंदोलन सुरु राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्ष आणि ठाकरेसेना इंडिया आघाडीसोबतच असणार आहेत. लोकांचा अधिकार आम्ही त्यांना मिळवून देणार, असे राष्ट्रवादी(शप) खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले.






