“…..हे पचनी पडत नाही”, “कितने आदमी थे” डायलॅागच्या दाव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

Jitendra Awhad | Sachin Pilgaonkar | नुकतीच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी ‘शोले’ चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटातील डायलॅाग खूप लोकप्रिय झालेले आहेत. या चित्रपटातील “कितने आदमी थे” हा डायलॅाग खूप लोकप्रिय आहे.
अमजद खान ज्यावेळी डायलॉग बोलत होते, तेव्हा तो पातळ आवाजात ऐकू येत होता. याची जाणीव झाल्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेले आणि त्यांच्या आवाजातच पुन्हा तो डायलॉग बोलून घेतल्याचे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरून सचिन पिळगावकर यांच्या विधानावर जोरदार निशाणा साधत काही प्रश्न केले आहे. अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही, असे या पोस्टमध्ये आव्हाड लिहिले आहे.
सचिन पिळगावकर काय म्हणाले होते?
‘शोले’ सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. मी अमजदला सांगितलं. माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता, असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “कितने आदमी थे…” आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. Because I Am A Singer Also. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे…, असे सचिन पिळगांवकर मुलाखतीत म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा
शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक – एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल.
गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील १९५०-६० च्या दशकातील नामांकित अभिनेते होते.
शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक – एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता.
डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा… pic.twitter.com/5YijSDxCja— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2025
म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही, असे म्हटले आहे. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही.
हेही वाचा : इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; ‘सामना’तून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात





