Tejas Thackeray : मोठी बातमी! तेजस ठाकरेंची प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल, तीन दिवसांपासून उपचार सुरू
Tejas Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Updated On:
Tejas Thackeray : आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख मुख्य नेते उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पण त्यांच्यावर कोणत्या कारणामुळे उपचार सुरू आहेत याची अधिकृत माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही. त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती आहे. तेजस ठाकरे यांना बुधवारी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे असल्याचे समजते. ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. महापालिका निवडणुकांत तेजस ठाकरे यांनी प्रचारातही आपला सहभाग नोंदवला होता. मुंबईतील अनेक शाखांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.






