Satara | तहसिलदारांनी भरला महिलेचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म

मेढा, (प्रतिनिधी) – तालुक्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी तहसिलदार तथा न्याय दंडा धिकारी म्हटल्यानंतर खूपच जबाबदाऱ्या प्रचंड काम, त्यात , येणाऱ्या विविध योजना, डोळ्यासमोर येवून ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका त्यांचे काम अशा विविध कामांचा लोंडा असताना चक्क जावळीच्या तहसीलदार हनुमंतराव कोळेकर यांनी चक्क सर्वसामान्य महिलेचा अर्ज स्वतः ऑनलाईन अपलोड करून भरला आणि अर्ज कधी भरायचा कसा भरायचा या विवंचनेत असणारी महिला आपला अर्ज तहसिलदार साहेबांनी स्वतः भरल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. हणमंतराव कोळेकर यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मामुर्डी येथील पती पत्नी रत्नाबाई शांताराम धनावडे व शांताराम धनावडे आपला अर्ज भरण्यासाठी मेढयाला आले होते. अनेक ठिकाणी त्यांनी विचारणा करत ते तहासिल कार्यालयात पोहचले .तेव्हा तहासिलदार कोळेकर यांनी विचारले काय काम आपले. त्यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा आहे.
मात्र, खूप वेळ जातो, नेट मिळत नाही असं म्हणताच, मग साहेब म्हटले चला मीच भरतो. थेट तहसिलदार कोळेकर साहेबानी त्यांचा अर्जच भरला. स्वतः फोटो काढला ऑनलाईन अर्ज भरूनही अपलोड ही केला आणि सक्सेस मेसेजही आला .
तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांच्या दालनाची सर्वसामान्यांना दारे खुली असतात. प्रत्येकाला आमचे साहेब वाटावे असेच ते कोणीही असो तक्रार घेवून येवू अथवा कोणतेही काम ते आत्मतेये तेने पाहतात आणि निपटारा करतात.
त्यांच्या या हातोडीमुळे ते सर्वसामान्यांत लोकप्रिय ठरत आहेत.त्यांना कोणता सोबत पुढारी, ओळखदार असं काहीही लागत नाही काम योग्य आणि बरोबर असेल तर जागेवरच फटाफट करतात. त्यामुळे जावळीचे तहसिलदार सर्वसामान्यांत लोकप्रिय आहेत .




