Teesta Water Project: चीनसोबतचच्या मैत्रीच्या नावाखाली भारताशी स्पर्धा? ; तिस्ताबाबत बांगलादेशी नेत्याचे खळबळजनक विधान
Teesta Water Project: भारतात उगम पावणाऱ्या आणि बांगलादेशात वाहणाऱ्या नदीवर एक प्रकल्प उभारला जात आहे. आता चीननेही या प्रकल्पात रस दाखवला आहे.

Teesta Water Project: भारतात उगम पावणाऱ्या आणि बांगलादेशात वाहणाऱ्या नदीवर एक प्रकल्प उभारला जात आहे. आता चीननेही या प्रकल्पात रस दाखवला आहे. दरम्यान, शेजारील देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते शफिकुर रहमान यांनी भारतालाचा सुनावले आहे.
याविषयी बोलताना त्यांनी,”हा प्रकल्प राबवण्याचा त्यांचा मानस आहे आणि नाराज झालेल्यांना आंबे पाठवून शांत करण्याचा ते प्रयत्न करतील” असे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच “भारताने त्यांचा आदर केला पाहिजे, “असेही ते म्हणाले.
ढाका याठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात रहमान यांनी, “भारत आमचा सर्वात जवळचा शेजारी आहे. आम्ही नेहमी आमच्या शेजाऱ्यांचा आदर करतो. केवळ भारताचाच नाही, तर सर्व शेजाऱ्यांचा. आम्हाला त्यांच्याकडून आदराची अपेक्षा आहे.” असे म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी, “बांगलादेशला भारतासोबत आदर आणि विश्वासाच्या आधारावर संबंध कायम ठेवायचे आहेत” असेही म्हटले. (Teesta Water Project)
हा एक अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगून ते म्हणाले, “तिस्ता प्रकल्प हा आमचा स्वतःचा प्रश्न आहे. हा आमचा प्रश्न आहे आणि बांगलादेशसाठी जे योग्य वाटेल ते आम्ही करू. आम्हाला आशा आहे की आमच्या प्रगतीमुळे आमचे सर्व मित्र आनंदी होतील.”
ते पुढे म्हणाले, “या मुद्द्यावर आमची भूमिका ठाम आहे. आम्ही आमच्या देशासाठी ही योजना राबवू.” आमचे मित्र आनंदी होतील, कारण दुःखी होण्याचे काहीच कारण नाही. जर कोणी दुःखी असेल, तर आम्ही राजशाहीहून आंबे पाठवून त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न करू. (Teesta Water Project)
चीनची रुची (Teesta Water Project)
अलीकडेच, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी बीजिंगला भेट दिली. यानंतर, या प्रकल्पात चिनी हस्तक्षेपाच्या चर्चेला वेग आला. त्यानंतर त्यांनी चीनचे मंत्री ली गुओयिंग यांच्याशी तीस्ता नदीच्या मुद्द्यावर चर्चा केली.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, २६ जून रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते महदी अमीन यांनी सांगितले की, बांगलादेश आणि चीन तीस्ता नदीसह नदी व्यवस्थापनात सहकार्य अधिक दृढ करण्यास सहमत झाले आहेत. दरम्यान,चीनने बांगलादेशच्या तीस्ता नदी मास्टर प्लॅनसाठी नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत तांत्रिक सहाय्य देण्यास स्वारस्य दाखवले आहे.
याचा भारतावर परिणाम होईल का? (Teesta Water Project)
असे मानले जाते की, बांगलादेशच्या या पुढाकाराचे पडसाद दिल्लीत उमटू शकतात आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो. तीस्ता नदीचा उगम पूर्व हिमालयात होतो आणि ती सिक्कीम व पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करते.
तीस्ता नदीचे खोरे भारताच्या संवेदनशील सिलिगुडी कॉरिडॉरजवळ आहे. हा २२ किलोमीटर रुंदीचा भूभाग मुख्य भूभागाला ईशान्येकडील राज्यांशी जोडतो.
गेल्या आठवड्यात, येथे एका पत्रकार परिषदेत नवी दिल्लीच्या संभाव्य चिंतांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले, “तिस्ता नदीचा सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि पुनर्वसन प्रकल्प हा बांगलादेशसाठी एक महत्त्वाचा सार्वजनिक कल्याणकारी प्रकल्प आहे.”
कोणत्याही देशाचे नाव न घेता ते म्हणाले, “या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी चीन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मला हे अधोरेखित करायचे आहे की, चीन-बांगलादेश सहकार्य कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करत नाही आणि ते कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या प्रभावापासून मुक्त असले पाहिजे.”





