Jio Recharge: जिओचा भन्नाट प्लॅन! २०० रुपयांत ३०GB डेटा आणि १५ OTT अॅप्सचा लाभ
Jio Recharge या प्लॅनमध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडिओ मोबाइल, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सनएनएक्सटी, होईचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस, प्लॅनेट मराठी, कांच्छा लंका आणि जिओटीव्ही यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.

Jio Recharge: देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओने मनोरंजनप्रेमी ग्राहकांसाठी एक आकर्षक OTT पास सादर केला आहे. केवळ २०० रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३०GB हाय-स्पीड डेटा, १५ लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन आणि १००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक मनोरंजन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.
जिओच्या या OTT पासची वैधता २८ दिवसांची आहे. या कालावधीत ग्राहकांना ३०GB अतिरिक्त 4G डेटा वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये अनेक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अॅप्ससाठी स्वतंत्र सदस्यत्व घेण्याची गरज भासणार नाही. (Jio Recharge)
या प्लॅनमध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडिओ मोबाइल, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सनएनएक्सटी, होईचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस, प्लॅनेट मराठी, कांच्छा लंका आणि जिओटीव्ही यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.
चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो, माहितीपट आणि थेट क्रीडा स्पर्धा पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन विशेष आकर्षण ठरू शकतो. विशेषतः यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडिओ आणि सोनीलिव्हसारख्या प्लॅटफॉर्म्सवरील लोकप्रिय कंटेंटचा लाभ एकाच प्लॅनमध्ये मिळत असल्याने ग्राहकांचा खर्च कमी होऊ शकतो. (Jio Recharge)

Jio Recharge: जिओचा भन्नाट प्लॅन! २०० रुपयांत ३०GB डेटा आणि १५ OTT अॅप्सचा लाभ
या प्लॅनची आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे १००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सची सुविधा. जिओटीव्हीद्वारे बातम्या, मनोरंजन, क्रीडा, संगीत, चित्रपट आणि इतर अनेक प्रकारचे चॅनेल्स ग्राहकांना पाहता येणार आहेत.
जिओच्या मते, हा प्लॅन ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरणारा आहे. कारण केवळ यूट्यूब प्रीमियमचे मासिक सदस्यत्वच सुमारे १४९ रुपयांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत फक्त २०० रुपयांत अनेक OTT प्लॅटफॉर्म्स आणि अतिरिक्त डेटा मिळणे ग्राहकांसाठी फायदेशीर मानले जात आहे. (Jio Recharge)
मात्र, हा OTT पास वापरण्यासाठी ग्राहकांच्या क्रमांकावर आधीपासून सक्रिय बेस प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे. स्वतंत्रपणे हा प्लॅन घेतल्यास त्यातील डेटा सुविधा कार्यरत होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्ज करण्यापूर्वी ही अट लक्षात घेणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी या प्लॅनमध्ये फक्त ५GB डेटा दिला जात होता. आता कंपनीने त्यामध्ये मोठी वाढ करत ३०GB डेटा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत २५GB अधिक डेटा मिळणार आहे. (Jio Recharge)
कमी किंमतीत भरपूर मनोरंजन, अतिरिक्त डेटा आणि अनेक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा लाभ मिळत असल्यामुळे जिओचा हा नवीन OTT पास ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





