Gudi Padwa MNS rally teaser : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर समोर; शिवतीर्थवर सभा, राज ठाकरे कुणावर तोफ डागणार?
Gudi Padwa MNS rally teaser : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थवर सभा पार पडणार असून ते या सभेत काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

Gudi Padwa MNS rally teaser : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर आले होते. मनसेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त इथे त्यांनी राज्यात पक्षाकडून नवीन सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असल्याचे सांगितले होते. ते यावेळी फार काही बोलले नाहीत. जे काही बोलायचे आहे ते गुढीपाडव्याच्या सबेत बोलेल असे राज ठाकरे म्हणाले होते. अशातच आता मनसेकडून गुढीपाडव्याच्या सभेसाठी एक खास टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
मनसेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. ही सभा मराठी नववर्षाच्या निमित्ताने असणार आहे. त्यामुळे त्यात मराठी अस्मिता, हिंदुत्व, स्थानिक मुद्दे आणि सध्याचे राजकीय/सामाजिक वाद हे मद्दे केंद्रस्थानी असतील.
मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात जे चाललयं ते पटत नाहीये? रोजच्या घटना पाहून मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची ही अवस्था बघून अस्वस्थ झाला आहात? असे सवाल विचारले आहेत. तसेच पुढे तुम्ही एकटे नाही आहात महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला असचं वाटतयं चला शिवतीर्थवर भेटूया उज्वल महाराष्ट्र घडवूया, अशी साद घालण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेतून मनसैनिकांना काय संबोधित करणार तसेच राज्यातील प्रश्नांवर काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
#गुढीपाडवा_मेळावा२०२६ #महाराष्ट्र #MNSAdhikrut pic.twitter.com/3GbEWKb9UQ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 15, 2026
हे मुद्दे केंद्र स्थानी असणार
१ मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मान-सन्मान
२ हिंदुत्व आणि धार्मिक मुद्दे
३ महाराष्ट्रातील स्थानिक मुद्दे
४ राज्य सरकार/केंद्राला प्रश्न
या मुद्द्यावर राज ठाकरे आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण करतील. याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाता झालेला मृत्यू त्यानंतर घातपात असल्याचा संशय, इराण-इस्राइल देशात सुरू असलेले युद्ध त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला गॅस आणि कच्चा तेलाचा तुटवडा या मुद्यांवर सरकारवर हल्लाबोल करु शकतात. यासोबत राज ठाकरे व्हिडिओ दाखवणार का याकडे लक्ष असणार आहे.





