Bollywood – बेबो या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या ती तिच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच करिनाच्या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये करिनाच्या लूकने चाहत्यांना थक्क केले. करिनाचा हा लूक पाहिल्यानंतर चाहते तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच करिनाची बहीण करिश्मा हिने या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या खूप चर्चेत आहे. करिश्माने नुकताच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये करिनाच्या चित्रपटातील एक क्लिप आणि फोटो शेअर केले. या फोटोसह तिने आपल्या बहिणीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. करिश्माने फोटोसोबत लिहिले- ‘हा खूप मनोरंजक चित्रपट आहे. माझ्या बहिणीच्या अभिनयाने माझ्या डोळ्यात पाणी आले’, यासोबतच करिश्माने संपूर्ण स्टार कास्टचे कौतुक केले आहे. या फोटोशिवाय करिश्माने करिनासोबतचा एक फोटोही तिच्या इन्स्टावर शेअर केला आहे. दोन्ही अभिनेत्रींचा हा लूक MAMI फिल्म फेस्टिव्हलमधील आहे. फोटोमध्ये करीना आणि करिश्मा दोघीही हसतमुख पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी नेहमीच तुझी चीअरलीडर राहीन. तु #TheBuckinghamMurders मध्ये काय करता हे पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. करिश्माच्या या पोस्टवरून ती आपल्या बहिणीच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.’ करीना कपूर खानचा हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. निर्माती म्हणून करिनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची Jio MAMI मुंबई चित्रपट महोत्सव 2023 मध्ये फीचर फिल्म म्हणून देखील निवड करण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये करीना कपूर एका गुप्तहेराची आणि जस भामरा नावाच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे, जिला आपले मूल गमावल्यानंतर बकिंघमशायरमधील 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा तपास करावा लागतो.