Team India : गंभीरच्या मार्गदर्शानाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करेल – राहुल द्रविड

Team India & Gautam Gambhir :- गौतम गंभीरने खेळाडू म्हणून अनेक वर्षे खेळला आहे. त्याने प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. त्यामुळे त्याच्यकडे अनुभवायची कमतरता नाही. मला खात्री आहे की, त्याच्या मार्गदर्शानाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला.
एका कार्यक्रमासाठी आलेल्या राहुल द्रविडने निवडक माध्यमांशी संवाद साधला. गौतम गंभीर यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध पराभावाचा सामना करावा लागला होता. मात्र, राहुल द्रविड यांनी गौतम गंभीरचे पाठराखण केली आहे. बोलताना द्रविड म्हणाला की, गौतम गंभीरकडे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवांच्या शिदोरीचा भारतीय संघाला फायदा होईल.
Ind vs Ban 1st Test : अश्विन-जडेजाची विक्रमी भागीदारी, मोडित काढला 24 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड….
राहुल द्रविड प्रशिक्षक असताना भारताने एकदिवसीय विश्वकरंडक पटकावला होता. त्याबरोबरीने भारताने विश्व कसोटीच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. आता गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा कसोटी हंगामाला सुरुवात झाली असून भारताला आगामी काळात बांगलादेश सोबत दोन, न्यूझीलंड सोबत तीन व ऑस्ट्रेलिया सोबत ५ कसोटीची मालिका खेळायची आहे.





