Retirement 2024 : भारतीय क्रिकेटसाठी कठीण होते 2024 वर्ष , कोहलीसह ‘या’ 6 स्टार खेळाडूंनी घेतली निवृत्ती…

Team India Cricket Player Retirement 2024 : भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. विशेष म्हणजे टीम इंडियाने याच वर्षात T20 विश्वचषकाचे विजेतेपदावर आपले नाव कोरले तर अनेक स्टार खेळाडूंनी 2024 मध्ये क्रिकेटला अलविदा देखील केला. टीम इंडियाच्या एकूण सहा खेळाडूंनी 2024 मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. या यादीत रविचंद्रन अश्विनसोबत विराट कोहली आणि रोहित शर्माचाही समावेश आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अश्विन आता भारताकडून खेळताना दिसणार नाही. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो नक्कीच खेळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटीनंतर अश्विनने हा निर्णय घेतला. अश्विनने आधीच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र कसोटी अनिर्णित झाल्यानंतर त्यानं निवृत्तीची घोषणा केली.
रोहित-कोहली आणि जडेजा टी-20 मधून निवृत्त…
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा आणि विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोघांसह जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला. या तिन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी अनेकदा मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. कोहलीने तर अनेक विक्रम केले, जे कोणत्याही खेळाडूला तोडणे सोपे नाही.
कार्तिक आणि धवन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिला निरोप…
शिखर धवन हा टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आहे. या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. धवनने 24 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली होती. त्याने भारतासाठी 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6793 धावा तर 34 कसोटी सामन्यांमध्ये 2315 धावा केल्या आहेत.
धवननंतर यष्टीरक्षक फलंदाज कार्तिकनेही निवृत्ती जाहीर केली. 1 जून रोजी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. कार्तिकने भारतासाठी 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा तर त्याने 26 कसोटी सामन्यांमध्ये 1025 धावा केल्या आहेत.





