India World Record : टीम इंडियाचा न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड! १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
India World Record : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

Team India scripts a 149-year Test cricket world record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सामन्यावर आपली पकड पूर्णपणे मजबूत केली असून, या सामन्यात भारतीय संघाने असा एक विश्वविक्रम केला आहे, जो कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजवर कधीही घडला नव्हता. हा विक्रम मोडणे किंवा त्याची बरोबरी करणे आता जवळपास अशक्य मानले जात आहे.
पहिल्या सातही विकेट्ससाठी सलग अर्धशतकी भागीदारी –
वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी एकत्रित सांघिक कामगिरीचे अद्भुत प्रदर्शन घडवत पहिल्या सातही विकेट्ससाठी किमान ५० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी रचली आहे. कसोटी इतिहासात एखाद्या डावात सलग पहिल्या सातही जोड्यांनी अर्धशतकी भागीदारी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी एका डावात आठ वेळा ५० पेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱ्या झाल्या होत्या, मात्र त्या सलग नव्हत्या.
राहुल, यशस्वी, पडिक्कल आणि गिलची भक्कम पायाभरणी –
𝐈𝐧𝐧𝐢𝐧𝐠𝐬 𝐁𝐫𝐞𝐚𝐤!
Outstanding batting effort from #TeamIndia to post a mighty 720/9d on the board – India’s highest total in an innings of an overseas Test – with a lead of 352 runs. 🔥 💪
Scorecard ▶️ https://t.co/SaMcNXtAVG
#NZvIND https://t.co/BUHh6cdOYj
— BCCI (@BCCI) November 22, 2026
भारतीय डावाची सुरुवात करताना सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची शानदार भागीदारी रचली. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावा जोडल्या. पुढे तिसऱ्या विकेटसाठी राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांच्यात ९१ धावांची, तर चौथ्या विकेटसाठी शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यात १०० धावांची महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी पाहायला मिळाली.
तळाच्या फलंदाजांनीही रचला भागीदारीचा कळस –
That’ll be Tea on Day 4 of the 1st Test.
Jasprit Bumrah picks up the wicket of the New Zealand Skipper, who departs for a duck.
New Zealand trail by 319 runs.
Scorecard – https://t.co/SaMcNXtAVG #NZvIND https://t.co/1ayryBQNf5
— BCCI (@BCCI) November 22, 2026
शुबमन गिल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अंशुल कंबोजने ऋषभ पंतच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. यानंतर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्यात सहाव्या विकेटसाठी ७५ धावांची, तर ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात सातव्या विकेटसाठी ५४ धावांची मोलाची भागीदारी झाली. या सलग सात भागीदाऱ्यांनी भारतीय डावाला ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले.
भारताचा ७२० धावांचा डोंगर, विजयासाठी आठ विकेट्सची गरज –
कर्णधार शुबमन गिलने ९ बाद ७२० धावांवर भारताचा पहिला डाव घोषित करत न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३६८ धावांच्या प्रत्युत्तरात भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेर २ बाद ११९ धावा केल्या असून, यजमान संघ अद्याप २३३ धावांनी पिछाडीवर आहे. आता पाचव्या आणि अंतिम दिवशी किवींचे उर्वरित आठ गडी लवकर बाद करून ऐतिहासिक विजय मिळवण्याची सुवर्णसंधी भारतासमोर आहे.





