Rohit Sharma : रोहित शर्माला आयसीसीकडून मोठा धक्का ! एकदिवसीय क्रमवारीत ‘एवढ्या’ स्थानांनी घसरण

टीम इंडियाने 4 मार्च रोजी सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे टीम इंडियाने १४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला आयसीसीच्या नॉक आउट सामन्यांमध्ये हरवले.
३ वेळा ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर मात
टीम इंडियाने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. यानंतर आयसीसी स्पर्धांमध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ३ वेळा आमने- सामने आले. मात्र या तिन्ही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. २०१५ मध्ये आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव केला. यानंतर २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा फायनलमध्ये पराभव केला. तसेच २०२४ च्या वर्ल्डकपमध्येदेखील ऑस्ट्रलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता.
रोहितला झटका
एकीकडे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहितला फटका बसला आहे. रोहित शर्माला फलंदाजांच्या क्रमवारीत 2 स्थानांचा फटका बसला आहे. रोहितची तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
टॉप १० मध्ये इंडियाचे ४ खेळाडू
या क्रमवारीत शुबमन गिल याने आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. तर विराट पाचव्यावरुन चौथ्या स्थानी पोहचला आहे. रोहितची तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर श्रेयस अय्यर याला या रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. श्रेयस नवव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.





