शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना करोनाची लागण
Updated On:

कोल्हापूर – शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार आसगावकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आसगावकर यांनी म्हटले आहे ,”माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काळजी करण्याचं कारण नाही. प्रकृती ठीक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्या. माझी प्रकृती उत्तम असून मी कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या अस त्यांनी म्हटलं आहे.





