अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण; पोस्टमधून चाहत्यांना दिली माहिती, आईचाही रिपोर्ट पॅाझिटिव्ह

Nikita Dutt infected with Corona : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बॅालीवूडमधील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीला कोरोना झाला आहे. अभिनेत्री निकित्ता दत्ता आणि तिच्या आईची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. याविषयी स्वतः निकिताने सोशल मीडियावर अकाऊंटवर चाहत्यांना माहिती दिली आहे.
नुकताच नेटफ्लिक्सवर निकिता दत्ताचा ज्वेल थीफ हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, जयदीप अहलावसोबत निकताने स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातमुळे ती चर्चेत असून तिचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. सोबत तिच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे.
निकिताने पोस्टमधून काळजी घ्या आणि सुरक्षित राहा असे आवाहन चाहत्यांना केले आहे. मला आणि आईला कोरोना झालाय. हा फार काळ राहणार नाही… छोट्या एका क्वारंटाईन ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटूच… काळजी घ्या.. आणि सुरक्षित राहा… असे निकताने पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram





