सलमान खानच्या “बिईंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेकडून करोना काळातील फ्रंटलाइन वर्कर्सना चहा-नाश्ता पुरवला जातो आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत कर्तव्य बजावणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा चहा-नाश्ता पुरवला जात असतो.
Big thank you @AUThackeray ji @BeingSalmanKhan bhai for making this possible as team @yuvasenabandraw for reaching out our Frontline force… means a lot when bhai comes to keep a check on the supply and motivate the team to reach out to one and all..Jai Hind !!! Jai Maharashtra pic.twitter.com/MNkk6JcbGn
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) April 25, 2021
“बिईंग ह्युमन’चीच शाखा असलेल्या “बिईंग हंगरी’च्या वतीने फूड ट्रकच्या वतीने हे खाद्यपदार्थ वितरित केले जात असतात. अलीकडेच सलमानने स्वतः या फूड ट्रकला भेट दिली आणि स्वतः या चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला.
Today we shall reach out the areas of Bandra – Worli – juhu – BKC – Agripada… proud feeling that we could do our bit ans our mark of respect for tireless service of @MumbaiPolice @mybmc and health warriors 🙏 pic.twitter.com/I3sfevkiVh
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) April 25, 2021
फ्रंटलाइन वर्कर्सना पुरवल्या जाणाऱ्या चहा-नाश्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड व्हायला नको, यासाठी सलमानने ही टेस्ट घेतली. हा नाश्ता त्याला खूप आवडला आणि त्याने काही सुधारणांसाठी सूचनाही केल्या आहेत. फ्रंटलाइन वर्कर्सच्या हितासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल सलमान खानवर सोशल मीडियातून खूप कौतुक केले जाते आहे.