#TataSteelChess | विदितने कार्लसनला बरोबरीत रोखले
Updated On:

नेदरलॅंड – टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले आहे. यासह विदितने 11व्या फेरीत सहा गुणांसह संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले.
दुसरीकडे आर. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाकडून पराभूत पत्करावा लागला. यामुळे तो 3.5 गुणांसह इतर दोघांसह संयुक्तपणे 12व्या स्थानावर आहे.
कार्लसनने (7.5 गुण) गुजराथीविरुद्ध स्पष्ट विजय गमावूनही आपले आघाडीचे स्थान कायम राखले. डचमन अनिश गिरीला त्याचा देशबांधव जॉर्डन व्हॅन फॉरेस्टकडून पराभव पत्करावा लागल्याने तो तिसऱ्या स्थानावर घसरला.





