Tata Nexon चे नवीन एडिशन मार्केटमध्ये लाँच, आकर्षक डिझाइनसह मिळणार खूपच शानदार फीचर्स; पाहा किंमत

Tata Nexon CNG: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही Nexon CNG चे नवीन मॉडेल गुपचूप लाँच केले आहे. कंपनीने या एसयूव्हीचे आकर्षक डिझाइनसह येणार रेड डार्क एडिशन लाँच केले असून, या नवीन एडिशनची किंमत 12.70 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
कंपनीने कारच्या नवीन एडिशनला काही बदल करत सादर केले आहे. यात लाल रंगात एक्सेंट, डार्क थीमसह येणारे फिनिश आणि प्रीमियम इंटेरियर दिले आहे. गाडीच्या चाकांवर देखील बोल्ड कार्बन ब्लॅक पेंट फिनिश दिले असून, यामुळे एसयूव्हीला अधिक स्पोर्टी लूक प्राप्त होतो.
Tata Nexon CNG Red Dark Edition ची किंमत
कंपनीने Tata Nexon CNG Red Dark Edition ला क्रिएटिव्ह प्लस एस, क्रिएटिव्ह प्लस पीएस आणि फियरलेस प्लस पीएस या तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केले आहे. या तिन्ही व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 12.7 लाख रुपये, 13.7 लाख रुपये आणि 14.5 लाख रुपये आहे.
Tata Nexon CNG Red Dark Edition चे स्पेसिफिकेशन्स
Tata Nexon CNG Red Dark Edition इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले असून, ते कमाल 99 बीएचपी पॉवर देते. यात डायरेक्ट सीएनजी स्टार्ट तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे हे बाजारातील पहिले टर्बोचार्ज्ड सीएनजी मॉडेल बनले आहे. हे स्पेशल एडिशन स्टँडर्ड व्हेरिएंटप्रमाणेच 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
कॅबिनमध्ये रेड लेदरेट अपहोल्स्ट्री, स्ट्राइकिंग रेड स्टिचिंग आणि ग्लॉसी पियानो ब्लॅक डिटेल्ससह रिफाइंड टच देण्यात आला आहे. यामध्ये 10.2-इंच इंफोटेनमेंट डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, एक डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनेल, जेबीएलचे 6-स्पीकर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि एक पॅनोरमिक सनरूफ दिले आहे.
याशिवाय, टू-स्पोक स्टेयरिंग व्हील, हिल-होल्ड कंट्रोल, स्टेयरिंग-माउंटेड कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, रिव्हर्स पार्किंग सेंसर, रियर AC वेंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रियर पॉवर आउटलेट, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन आणि एअर प्यूरीफायर सारखे फीचर्स देखील यात मिळतील. या कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. कारचे सीएनजी मॉडेल 17 किमी/किलोग्रॅमपर्यंत मायलेज देते.





