तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सचा नफा 22 टक्क्यांनी घटला; मारुती सुझुकीचा 16 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली – मागणी अभावी बर्याच वाहन कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. टाटा मोटर्स या कंपनीने बुधवारी आपला तिसर्या तिमाईचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार या तिमाहीत कंपनीचा नफा 22 टक्क्यांनी कमी होऊन 5,578 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा नफा 7,145 कोटी रुपये होता, असे टाटा मोटर्स कंपनीने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल कमी होऊन 1.13 लाख कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा महसूल 1.10 लाख कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 1.07 लाख कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 1.04 लाख कोटी रुपये इतका होता.
मारुती सुझुकीला नफा –
दरम्यान मारुती सुझुकी कंपनीला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 16 टक्क्याने वाढून 3,727 कोटी रुपये इतका झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 3,207 कटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 38,764 कोटी रुपये इतका झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने हा ताळेबंद जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव 0.72 टक्क्यांनी वाढून 12,210 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.





