Ratan Tata Passed Away :”टाटा म्हणजे, दूरदर्शी व्यवसायिक नेते आणि असामान्य व्यक्तिमत्त्व…”; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे दि.9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मोदींनी आपल्या संवेदनशील ट्वीटद्वारे रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले, “श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी व्यवसायिक नेते, करुणामय आत्मा आणि असामान्य व्यक्तिमत्त्व होते.
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared… pic.twitter.com/p5NPcpBbBD
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
त्यांनी भारतातील एक जुनी आणि प्रतिष्ठित उद्योगसमूहाला स्थिर नेतृत्व प्रदान केले. मात्र, त्यांचे योगदान फक्त व्यवसायपर्यंत मर्यादित नव्हते. आपल्या नम्रता, दयाळूपणा आणि समाजाचे भले करण्याच्या अखंड सेवाभावामुळे त्यांनी अनेक लोकांची मने जिंकली.”
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्याचबरोबर, त्यांच्या समाजकार्यातील योगदानामुळेही ते नेहमीच समाजाभिमुख व्यक्ती म्हणून ओळखले जात.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या गुणांचा विशेष उल्लेख केला आणि टाटा यांच्या निधनामुळे राष्ट्राचे एक मोठे नुकसान झाल्याचे व्यक्त केले. रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योगजगत, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.





