Taslima Nasrin on Pahalgam attack | जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. त्यात निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रविवारी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि २०१६ मध्ये ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना केली. यावेळी त्यांनी या हल्ल्यावर संताप व्यक्त करत “जोपर्यंत इस्लाम आहे तोपर्यंत दहशतवाद राहील” असे मोठे विधान केले आहे. दिल्ली साहित्य महोत्सवातील एका सत्रात, “लज्जा” लेखिका तस्लिमा नसरीन यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी, “१,४०० वर्षांत इस्लामचा विकास झालेला नाही.”असे सांगितले. तस्लिमा नसरीन या कार्यक्रमात बोलताना, “जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते दहशतवाद्यांना जन्म देत राहील. २०१६ च्या ढाका हल्ल्यात, मुस्लिमांना कलमा म्हणता येत नसल्याने मारण्यात आले. जेव्हा श्रद्धेला तर्क आणि मानवतेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते तेव्हा असेच घडते.” असे मोठे विधान त्यांनी केले. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील एका पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी २६ जणांची गोळ्या घालून हत्या केली, ज्यात बहुतेक पर्यटक होते. १ जुलै २०१६ रोजी ढाक्यातील होली आर्टिसन बेकरीमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाने गोळीबार केला आणि २९ जणांचा मृत्यू झाला. तस्लिमा नसरीन यांनी हे मोठे विधान केले Taslima Nasrin on Pahalgam attack | पहलगाम हल्ल्यातील काही वाचलेल्या आणि प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला आहे की, हल्लेखोरांनी लोकांना “कलमा” म्हणण्यास सांगितले आणि जे लोक असे करत नव्हते त्यांना गोळ्या घातल्या. तस्लिमा नसरीन म्हणाल्या, “जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद अस्तित्वात राहील.” तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या, “युरोपमधील चर्च संग्रहालयांमध्ये रूपांतरित झाले आहेत, परंतु मुस्लिम सर्वत्र मशिदी बांधण्यात व्यस्त आहेत. हजारो मशिदी आहेत आणि त्यांना आणखी मशिदी बांधायच्या आहेत. ते जिहादी निर्माण करतात. मदरसे नसावेत. मुलांनी फक्त एकच नाही तर सर्व पुस्तके वाचली पाहिजेत.” ईशनिंदेच्या आरोपानंतर, नसरीन १९९४ पासून स्वीडन, अमेरिका आणि भारतात निर्वासित जीवन जगत आहे. “मला भारत आवडतो, ते घरासारखे वाटते.” Taslima Nasrin on Pahalgam attack | त्या यावेळी बोलताना, “मी अमेरिकेची कायमची रहिवासी आहे आणि तिथे गेल्या १० वर्षांपासून राहतेय, पण मला नेहमीच बाहेरच्या व्यक्तीसारखे वाटायचे. कोलकात्यात आल्यानंतरच मला घरी असल्यासारखे वाटले. पश्चिम बंगालमधून हाकलून लावल्यानंतर, दिल्ली मला दुसऱ्या घरासारखे वाटले. या देशाने मला स्वतःची अशी भावना दिली आहे जी माझा स्वतःचा देश मला देऊ शकला नाही.” असे म्हणाल्या. तसेच तस्लिमा नसरीन म्हणाल्या, “मला भारत आवडतो. ते घरासारखे वाटते.”