अभिनेत्री तारा सुतारियाची माजी मुख्यमंत्रीच्या नातवासोबत डेटिंगच्या चर्चा; डिनर डेटचा व्हिडीओ व्हायरल

Tara Sutaria | बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाच्या लव्ह लाईफबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. तारा सुपारिया आणि वीर पहाडिया डेट करत असल्याचे सांगितले जातं. अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. काल रात्री त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये पुन्हा एकदा हे दोघे स्टार्स एकत्र दिसले. त्यावरून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.
व्हिडीओमध्ये गाडीतून उतरताच दोघे एकमेकांचा हात धरून बाहेर आल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचे म्हणणे आहे की हे दोघे नक्कीच डेट करत आहेत. तारा आणि वीरची जोडी चाहत्यांना आवडत आहे. यापूर्वीही त्यांना एकत्र रॅम्प वॉक करताना पाहिले गेले होते.
View this post on Instagram
याआधी तारा सुतारिया रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन याला डेट करत होती. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा असताना दोघांचे ब्रेकअप झाले. आता तारा सुतारियाने वीर पहाडियाला डेट करण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जातं आहे. Tara Sutaria |
वीर पहाडिया याचे नाव यापूर्वी सारा अली खान हिच्यासोबत जोडले गेले आहे. वीर पहाडिया याचा भाऊ शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वीच दोघे तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. Tara Sutaria |
वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे दोघे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या मोठ्या मुलीचे हे दोन्ही मुले आहेत. Tara Sutaria |
हेही वाचा :
राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर; शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्यात राहणार उपस्थित





