Tara Sutaria Engagement: तारा सुतारियाच्या हातात दिसली एंगेजमेंट रिंग? वीर पहाडियासोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये नवा ट्विस्ट
Tara Sutaria Engagement: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही आठवड्यांपासून तारा आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या अफवा जोरात होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती.

Tara Sutaria Engagement : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही आठवड्यांपासून तारा आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या अफवा जोरात होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता ताऱ्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना नवं वळण मिळालं आहे.
तारानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक स्टायलिश फोटो शेअर केला असून तो पाहताच व्हायरल झाला. या फोटोत तारा नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. ती काळ्या रंगाच्या मगमधून कॉफी पिताना दिसतेय. मात्र या फोटोत तिच्या सौंदर्यापेक्षा हातातील मोठ्या डायमंड रिंगनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
कॉफीपेक्षा अंगठी ठरली चर्चेचा विषय
फोटोमध्ये ताराच्या हाताच्या रिंग फिंगरवर मोठी हिर्याची अंगठी स्पष्टपणे दिसते. फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली “ही एंगेजमेंट रिंग आहे का?” “ताराने गुपचूप साखरपुडा केला आहे का?” असे अनेक प्रश्न चाहते विचारू लागले.Tara Sutaria Engagement:
ओरीच्या कमेंटनं वाढली उत्सुकता
या पोस्टवर सोशल मीडिया सेन्सेशन ओरी यानं केलेल्या कमेंटमुळे चाहत्यांचा संशय अधिकच बळावला. एका युजरनं लिहिलं, “ही प्रपोजल रिंग आहे का?” तर दुसऱ्यानं म्हटलं, “मग साखरपुड्याचा व्हिडीओ कधी पाहायला मिळणार?” काही चाहत्यांचं असंही म्हणणं आहे की तारा आणि वीर यांच्यात सगळं ठिक आहे आणि ही अंगठी त्यांच्या नात्याच्या पुढील टप्प्याचं संकेत असू शकते.

ब्रेकअपच्या अफवांची पार्श्वभूमी
तारा आणि वीर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा ए.पी. ढिल्लनच्या कॉन्सर्टमधील ताराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत तारा आणि ए.पी. ढिल्लन यांच्यातील जवळीक पाहून वीर पहाडिया अस्वस्थ दिसत असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, या अफवांवर तारा किंवा वीर कोणाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आता ताराच्या हातातील ही डायमंड रिंग पाहून चाहते पुन्हा एकदा गोंधळात पडले आहेत खरंच साखरपुडा झाला आहे की ही फक्त एक फॅशन स्टेटमेंट? याचं उत्तर मात्र ताराच देऊ शकते.Tara Sutaria Engagement:





