Tara Sutaria: ‘टॉक्सिक’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये तारा सुतारियाचा जलवा; लेपर्ड ड्रेस आणि विंटेज लूकने वेधलं सगळ्यांचं लक्ष!
Tara Sutaria ट्रेलर लॉन्चसाठी ताराने लेपर्ड प्रिंटची ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केली होती. एंकल लेंथ असलेल्या या ड्रेसमध्ये तिचा लूक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत होता.

Tara Sutaria: अभिनेता यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये यशचा दमदार अंदाज आणि अॅक्शनची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री तारा सुतारियाचीही चर्चा होत आहे. ‘टॉक्सिक’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात तारा सुतारियाने आपल्या खास ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
ट्रेलर लॉन्चसाठी ताराने लेपर्ड प्रिंटची ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केली होती. एंकल लेंथ असलेल्या या ड्रेसमध्ये तिचा लूक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत होता. ड्रेसवर असलेला लेपर्ड प्रिंट आणि ऑफ-शोल्डर डिझाइनमुळे तिच्या लूकला खास अंदाज मिळाला होता. ड्रेसला फुल स्लीव्ह्ज आणि बॅक स्लिटसारखे डिझाइन डिटेल्स देण्यात आले होते. ग्लॅमरस लूक असूनही ताराने तो अतिशय एलिगंट पद्धतीने कॅरी केला.
ताराने या ड्रेससोबत काही आकर्षक अॅक्सेसरीजही परिधान केल्या होत्या. तिने स्टेटमेंट नेकपीस, स्टड इअररिंग्स आणि गोल्डन रिंग्स घातल्या होत्या. या अॅक्सेसरीजमुळे तिच्या लूकला आणखी उठाव मिळाला. मात्र, तिच्या संपूर्ण लूकमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते तिच्या हेअरस्टाइलने.
रेट्रो हेअरस्टाइलने दिला विंटेज टच
ताराने तिचे केस रेट्रो हॉलीवूड वेव्ह्जमध्ये स्टाइल केले होते. या हेअरस्टाइलमुळे तिचा लूक १९४० आणि १९५०च्या दशकातील क्लासिक ग्लॅमरची आठवण करून देत होता. आधुनिक फॅशनसोबत जुन्या काळातील ग्लॅमरचा सुंदर मिलाफ तिच्या लूकमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात तारा इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक दिसत होती.
View this post on Instagram
ताराने आपल्या फोटोशूटमध्ये हातात हाफ-कर्व डिझाइनचा फॅनही घेतला होता. या फॅनसोबत तिने दिलेला पोज तिच्या लूकला आणखी खास बनवत होता. तिच्या फोटोशूटमध्ये रॉयल कोर्ट फोटोग्राफी आणि गीशा स्टाइलचा प्रभाव दिसून येत होता. ताराने या लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ताराने काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती खुर्चीवर बसून कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा विंटेज अंदाज आणखी उठून दिसत आहे. फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
‘टॉक्सिक’मध्ये महत्त्वाची भूमिका
‘टॉक्सिक’च्या ट्रेलरमध्ये तारा सुतारियाची छोटीशी झलक पाहायला मिळते. ट्रेलरमधील तिच्या काही दृश्यांमुळे तिचे पात्र चित्रपटाच्या कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळतात. एका दृश्यात ती ग्लॅमरस अंदाजात दिसते, तर दुसऱ्या दृश्यात तिच्या पात्राची भावनिक अवस्था पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटात तिचे पात्र नेमके काय वळण घेणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ताराच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी कमेंटमध्ये हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. आता यशच्या अॅक्शनसोबत ताराचे पात्र चित्रपटाच्या कथेला कोणत्या दिशेने घेऊन जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





