तपकीर हे जनतेच्या मनातील लोकप्रतिनिधी : उपमुख्यमंत्री फडणवीस

धनकवडी – खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढविणार महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर हे चोवीस तास बारा महिने जनतेसाठी उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी आहेत. तपकीर हे जनतेच्या मनातील लोकप्रतिनिधी आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार तापकीर यांच्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. फडणीवस म्हणाले की. भिमराव तापकीर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मागे उभे राहून त्यांना विजयी करा. कमळाचे बटन दाबा असे आवाहनही फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.
फडणवीस यांनी तापकीर यांच्या कार्याची प्रशंसाही केली. या सभेनंतर आणि पदयात्रे दरम्यान तापकीर यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर खडकवासला मतदारसंघात महायुतीचा विजय सुनिश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बिबवेवाडी-राजीव गांधी नगर येथे पदयात्रा व गाठीभेटी घेऊन महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांनी वेगाने प्रचार सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, महिला आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण होते. आमदार तापकीर यांच्या कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज लाईन आणि स्थानिक विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली आहेत.
शिवाय जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. माजी नगरसेविका राणी भोसले, रुपाली धाडवे, दिनेश धाडवे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितेंद्र कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, महेश भोसले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.





