टांझानियाचा अमली पदार्थ तस्कर अखेर जाळ्यात
Updated On:

पुणे : अमली पदार्थ विकणाऱ्या टांझानियातील दोन नागरिकांना पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. पिसोळी भागात ही कारवाई करण्यात आली.
अब्दला रामाधनी आणि राजाबु हरिरी सल्लेह (दोघे सध्या रा. व्हीटीपी अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री) असे या तस्करांची नावे आहेत.
पिसोळी येथील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवर आलेल्या दोन परदेशी व्यक्ती कोकेन विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्यासह पथकाने दोघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 22 ग्रॅम 710 मिलिग्रॅम कोकेनसह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंखे यांनी ही कारवाई केली.





