Pune News : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यासोबतच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याने मध्यवर्ती भागात विशेष नियोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) येथून वळवून जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि टिळक रस्ता या मार्गाने सोडण्यात येणार आहे.

महापालिका भवनाकडे जाणाऱ्या पीएमपी बस सेवा देखील स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता आणि झाशीची राणी चौक या पर्यायी मार्गाने चालवण्यात येतील. तसेच, आप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौक (बुधवार चौक) कडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहणार असून या भागातील वाहतूक बाजीराव रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे.

लाल महाल चौकातून गणेश रस्त्याकडे जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज पुणेकरांनी या भागात जायचे असल्यास पर्यायी मार्ग कोणते आहेत ते पाहून प्रवास करावा.

हेही वाचा : Nana Patole : “टेलिप्राम्प्टरसमोर दिलेले हे भाषण महिलांच्या सन्मानासाठी नव्हते, तर….”; PM मोदींवर नाना पटोलेंचा घणाघात म्हणाले “56 इंचाची छाती…”